याहु कणसरा, जननायक बिरसा मुंडा, आद्यक्रांतिकारक राघोजी भांगरे, क्रांतिवीर देवजी राऊत, विरांगणा राणी दुर्गावती, क्रांतिवीर खाजा नाईक, रॉबिनहूड तंट्या मामा भील, क्रांतिवीर पुंज्या राणा भील, विरांगणा झलकारी बाई कोळी, क्रांतिवीर तिलका मांझी, क्रांतीकारी नाग्या कातकरी, क्रांतिवीर बाबुराव शेडमाके, संविधान सभा सदस्य जयपालसिंग मुंडा, शांतिदूत नेल्सन मंडेला यांच्या प्रतिमा..
वरील शीर्ष स्थानी असाव्यात (पॅम्प्लेटसाठी नमुना)
*वनवासी, वनबंधू गिरिजन नहीं, हम हैं आदिवासी इस देश के मुलनिवासी*!
प्रकृति ही जीवन, आप की जय, जोहार,
जय आदिवासी !
*९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनाच्या सर्व आदिवासी बांधवांना मनःपूर्वक शुभेच्छा*!
पार्श्वभूमी : दिनांक २३ डिसेंबर १९९४ रोजीचा संयुक्त राष्ट्र संघाच्या आमसभेत पारित झालेल्या ठराव क्र. ४९/२१४ नुसार संपूर्ण जगभर ९ ऑगस्ट हा आंतरराष्ट्रीय आदिवासी दिवस साजरा केला जातो. भारतातही ९ ऑगस्ट या दिवसाचे महत्व बहुसंखेने आदिवासी समुदाय असलेल्या क्षेत्रात साजरा करण्यात येतो. आपल्या अस्तित्व व आत्मसन्मानासाठी वर्षानुवर्षे आदिवासी बांधव संघर्ष करीत आहेत. या दिवसाच्या निमित्ताने एकात्मतेची, समान संस्कृतीची भावना निर्माण होऊन ९ ऑगस्ट हा आदिवासी आत्मसन्मान दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो आहे . गेल्या २०१७ पासून महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास विभाग व शासनाचे इतर विभागामध्ये शासकीय स्वरूपात हा दिवस साजरा करण्यात येतो आहे.
*आदिवासी समाजाचे सांकृतिक वेगळेपण, मानवत्तेबदल अपार/असीम श्रद्धा, निसर्गावरील अतुलनीय प्रेम, विश्वास, स्वाभिमानी, सत्य, चिकाटी आणि प्रामाणिकपणाचा अत्युच्च कळस या पारंपरिक गुणांचा गौरव* म्हणून “युनोने घोषणा केल्यानुसार ९ ऑगस्ट हा जागतिक आदिवासी (मूळनिवासी) दिन म्हणून साजरा करण्यात येतो”.
संयुक्त राष्ट्र संघाच्या (युनो) ठरावानुसार ९ ऑगस्ट १९९४ पासून जागतिक आदिवासी दिवस साजरा करण्यास सुरुवात झाली. हा दिवस म्हणजे तमाम आदिवासींच्या आत्मसन्माचा, त्यांच्या अस्तित्वाचा दिवस म्हणून सर्व आदिवासींना त्यांच्या न्याय, हक्क, कर्तव्य अधिकार यांची जाणीव करून देणे, त्यांची वैशिष्ट्यपूर्ण संस्कृती, देवदेवत्ता, भाषा, निसर्गासी असलेले नाते, मानवी जीवनमूल्ये, जल, जंगल, जमीन, व जीव यांतून मिळविलेले सहज शिक्षण , त्यांच्या जीवन जगण्याचा, सण, उत्सव साजरा करण्याच्या पद्धती,खाद्य संस्कृती वनौषधी अशा विविध पैलुंविषयी चर्चा व्हावी, माहिती तंत्रज्ञान व जगतिकीकरणात “आदिवासी माणूस” शेवटचा “श्वास” तर घेत नाही ना ? याविषयावर गांभीर्याने चर्चा करणे.
विकसित समाजाला आपल्या चालीरीती, कला-कौशल्य, नैसर्गिक संपदा बहाल करून स्वत: मात्र उपाशी झोप घेत आहे. त्या तमाम आदिवासी बांधवांना त्यांच्या अस्तित्वाची, हक्क व कर्तव्याची जाणीव करून देणे. भारताला स्वातंत्र्य मिळून आज ७५ वर्ष होत आहेत परंतू न्याय, स्वातंत्र्य, समता व बंधुता काय असते ? हे अद्यापही वाट्याला आलेले नाही. किंबहूना ह्या देशाचे आपण कुणी आहोत की नाही ही ही सल आहे. आदिवासी देशाचा मूळ मालक अस्तित्वहीन झाला आहे, याची माहिती करून देवून, वनहक्क, अॅट्रासिटी कायदा, आरक्षण, संविधान, बिगर आदिवासींची घुसखोरी, विविध आदिवासी हिताय कायद्यांची माहिती देवून समाजात ह्या दिवसांनिमित्त जन जागृती निर्माण करणे.
देशातील विविध आदिवासी बहुल राज्यांमध्ये / जिल्ह्यांमध्ये, गावोगावी आदिवासी दिनी विविध कार्यक्रम घेऊन राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीयस्तरावर आदिवासी समुहाच्या हक्कासाठी असलेल्या संकेताची, कायद्याची समाजाला विविध गटातील एकात्मतेची, हक्क व कर्तव्याची, समस्यांची, अन्याय अत्याचारांची, कल्याणकारी योजनांची माहिती करून देणे, धार्मिक आक्रमण थांबविणे, आदिवासी समुहाची धर्मनिरपेक्ष जीवनशैली समजावून सांगणे, अन्याय अत्याचार विरोधात उलगुलान करणे, खाजगीकरणाने आदिवासी सामूहिक जीवन पद्धतीस सुरुंग लावले आहे, विकासाच्या नावाखाली वृक्षतोड भौगोलिक विकृतिकरण होत आहे, त्यासाठी संस्कृतीचे संवर्धन व्हावे, शांतता, पर्यावरण रक्षण, मानवी कल्याणासाठी प्रबोधन करणे या उदात्त हेतूने “ आत्मसन्मानाचा / स्वाभिमानाचा दिवस” म्हणून बहुसंखेने, ९ ऑगस्ट आदिवासी दिनी स्वयंस्पुर्तीने सहभागी व्हावे. यासाठीच या कार्यक्रमाचे आयोजन सालाबादाप्रमाणे करण्यात येत आहे.
गेल्या दोन वर्षापासून कोविड - १९ च्या नैसर्गिक आपत्तीमुळे मानवतेवर मोठे संकट कोसळले असल्याने उत्सवावर निर्बंध आलेले आहेत. त्यानुषंगाने सण स्वरूपात सदर दिवशी *घरासमोर रांगोळी, घरावर विद्युत रोषणाई, आदिवासी पारंपारिक वेषभूषा परिधान करणे, आदिवासी पूर्वज / देवदेवतांची आळवणी, आदिवासी क्रांतिकारकांच्या प्रतिमेचे पूजन, परिसरात, मोकळ्या उघड्या बोडक्या टेकड्या, डोंगर आदी ठिकाणी सामूहिक वृक्ष लागवड करण्यात येत आहे. या दिवशी जसे उपलब्ध असेल तसे आदिवासी खाद्यसंस्कृतीची मेजवानी* करण्यात येते.
मात्र काही बिगर आदिवासी गट/ समूह जाणीवपूर्वक
आदिवासींना वनवासी, वनबंधू, गिरिजन, नक्षलवादी, लंगठे, जंगली,
म्हणून संबोधतात, जागृत आदिवासींमध्ये या अपनास्पद, मानहानिकारक, दर्जा दाखविणार्या शब्दप्रयोगाबद्दल राग, चीड, निर्माण निर्माण होत आहे. राज्य व केंद्र सरकार शासन स्तरावर अनुसूचीत जमातींना आदिवासी हा सर्वसामान्य शब्द वापरत आहेत. हरिजन व गिरिजन हे शब्दप्रयोग करण्यास केंद्र सरकारने जशी बंदी केली आहे. तशीच बंदी या हया मानहानीकारक शब्दावर आणावी, अशी मागणी आदिवासी बांधव करीत आहेत.
आदिवासी माणसा जागा हो, संघर्षाचा धागा हो, तुझं अस्तित्व शेवटचा श्वास घेत आहे. विकासाच्या नावाने तुझं अस्तित्वच संपुष्टात येत आहे.
"वे लढे हमारे वर्तमान के लिए, हम लढेंगे उनके इतिहास के लिए!"
“स्वाभिमानी लोकच संघर्षाची परिभाषा समजू शकतील, जे लोक संघर्ष करीत नाहीत तेच खरे गुलाम आणि लाचार आहेत”.
"मावा माटे, मावा राज "
(आमच्या गावात, आमचं सरकार)
(जननायक बिरसा मुंडा )
(डॉ. बाबासाहेब आंबेडकर)
९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवसाच्या सर्व बांधवांना मनःपूर्वक शुभेच्छा !
*प्रकाशक* -
महाराष्ट्र राज्य आदिवासी बचाव अभियान
*संकलन व लेखन* :
किसन मोंढाजी ठाकरे,
केंद्रीय सरचिटणीस आदिवासी बचाव अभियान
No comments:
Post a Comment